आदरणीय मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे मुलं येथे उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिरानिमित्त आले असता आम्ही युवक्रांती संघटना व स्थानिक कोरकू गोंड जमाती च्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले
मूल
देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा अभियानांतर्गत आज मूल उपजिल्हा रुग्णालयात माजी मंत्री तथा बल्लारपूर क्षेत्राचे विद्यमान आमदार,आदरणीय मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे आज मुलं येथे उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिरानिमित्त आले असता आम्ही युवक्रांती संघटना व स्थानिक कोरकू गोंड जमाती च्या लोकांची समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले
मूल येथील वार्ड क्रं. 14 मध्ये गेल्या25 वर्षापासुन100 ते 200लोकांची वस्ती आहे
कोरकु गोंड समाजाचे आदिवसाी कुटुंब आहे हे मोलमजूरी करून देवी देवतांचे फोटो व महापुरुषांचे फोटो आणि भेटेल ते निकृष्ट दर्जाचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहे फाटले कपळे लावून ते अन्न वस्त्र ची गरज तर भागवत आहे परंतु कोरकू गोंड ही जमात मूळनिवासी असून स्वतःची हक्काची 1 इंच जमीन सुद्धा नसल्या कारणाने अनधिकृत पणे रेल्वेच्या खाली जागेवर 25 वर्षा पासून लहानसे झोपळे बांधून झोपळी मध्ये त्यांना राहावं लागत आहे
आपल्या देशाचे देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वप्न आहे की लोकांना घरकुल योजना मिळाली पाहिजे घरकुल योजना ही फक्त ज्यांच्या ज्यांच्या कळे जागा उपलब्ध आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो आहे परंतु कोरकू गोंड यां सारख्या जमातीचे लोक निवडणुकीत सहभागी होउन राज्यकरिते निवडतात परंतु हेच शासन यांच्या मूलभूत समस्याचे निराकरण करू शकत नाही हेच दुःखद आहे
यांची अपेक्षा फक्त आपले काम आणि मुलांना अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण भेटावं म्हणून वोटिंग करतात पण यांच्या कडे प्रशासनाचा कुठे तरी दर्लक्ष होत आहे प्रशासनाने अष्या नागरिकांचा आळाखळा घेऊन यांना जागेचे पट्टे व घरकूल बांधून यांना सहकार्य करावे . यांच्याकडुन नगर परिषदेमार्फत घर आणि नळ ट्रक्स आकारला जात आहे मात्र त्यांना अनेक मुलभुत समस्येचा त्रास आहे परंतु नगर परिषद त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
जवळपास 25 वर्षापासुन सदर कोरकु गोंड समाजाचे कुटुंब वार्ड क्रं. 14 मध्ये वास्तव्य करीत आहे, त्यांना पावसाळयात ये जा करतांना चांगलीच कसरत करावी लागते, नाली-रस्ता नसल्याने ये-जा करण्यासाठीही अनेक अडचणीचा सामाना करावा लागत आहे. यापरिसरात मुलभूत सोयी-सुविधा नाही, ना बरोबर पाण्याची सोय नाही सांडपाण्याची गरिबीत खाण्यापीण्याची समस्या तर आहेच परंतु सांडपाण्याची वेवस्था नसल्यामुळे डेंगू, मलेरिया, टायफाईड वारंवार ताप येणे यां सारख्या समस्याला त्यांना समोर जावे लागत आहे सांडपान्या करिता नाल्या बांधून द्यावं व राहण्याकरीता जागा व घरकुल मिळावे यासाठी येथील नागरीकांनी अनेकदा प्रशासनाकडे विनंती केलेली आहे. क्षेत्राचे आमदार मान. ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सन 2020 मध्ये निवेदन दिले होते, दरम्यान सुधिरभाऊनी कोरकू गोंड जमातीच्या लोकांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांना यांची गरज समजली नाही आणि कोरकू समाजाच्या लोकांच्या मूलभूत गरजाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले हे अतिशय गंभीर बाब आहे.
कृपया कोरकु गोंड वस्तीची समस्या तात्काळ सोडविण्यात यावे अन्यथा युवाक्रांती संघटना स्थानिककोरकू गोंड जमात नागरीकांना घेवुन आपल्या कार्यालयापुढे धरणे आदोलन केल्याशिवाय राहणार नाही.आणि आंदोलना दरम्यान काही उनुचित प्रकार घडलतास याला शासन प्रशासन जवाबदार असणार



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!