बल्लारपूर शहरात स्मार्ट मीटर लावण्याचे काम तात्काळ थांबवावे – शहर काँग्रेस कमिटीची मागणी
तालूका - प्रतिनिधी वसंत मुन
बल्लारपूर : - दिनांक. ०१ ऑगस्ट २०२५ बल्लारपूर शहरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत सुरु असलेल्या स्मार्ट मीटर लावण्याच्या कामावर तात्काळ बंदी घालावी, अशी जोरदार मागणी शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. यासाठी त्यांनी उपकार्यकारी अभियंता अरविंद काटकर यांना निवेदन सादर केले.काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीजबिल दुप्पट येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी एजन्सीकडून ग्राहकांवर जबरदस्ती केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे ग्राहकांचा विरोध वाढत चालला असून जुन्या मीटरच्या बदल्यात लावले गेलेले स्मार्ट मीटर त्वरित काढून टाकावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.या निवेदनप्रसंगी घनश्याम मूलचंदानी (महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव),देवेंद्र आर्य (शहराध्यक्ष),अब्दुल करीम शेख (माजी शहराध्यक्ष), भास्कर माकोडे, डॉ. सुनील कुलदीवार, नरेश मूंधड़ा, सुनंदा आत्राम, नरसिंग रेब्बावार, प्रणेश अमराज, मेहमूद पठाण, कासिम शेख, मंगेश बावणे, नरेश आनंद, नरेश बुरांडे यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, इंटकचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटरचे काम थांबवले नाही, तर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!