नगरपरिषद सक्सेना प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांच्या हस्ते
शहर - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - १५ ऑगस्ट नगरपरिषद सक्सेना प्राथमिक शाळेत ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी नेमक्या ७:३० वाजता शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर जीभकाटे यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक अनिल चेटुले तसेच सहाय्यक शिक्षिका ज्योती हिंगे मॅडम, मोना मॅडम व श्वर्या मॅडम उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व नृत्य सादर करून वातावरण देशभक्तीमय केले.मुख्याध्यापक चेटुले यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी घ्यावयाची प्रेरणा यावर भर दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व पालकवर्गाने सक्रिय सहभाग नोंदविला. शेवटी उपस्थितांना मिठाई वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!