तहसील कार्यालय पवनी येथे स्वातंत्र्य दिनाचा उत्साहात साजरा

राष्ट्रध्वजाला सलामी, देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - १५ ऑगस्ट २०२५  तहसील कार्यालय पवनी येथे आज ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी तहसीलदारांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे विधिवत ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांनी ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताने देशभक्तीचा संदेश दिला.या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, स्थानिक नागरिक, महिला बचतगट सदस्य,  वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे स्काऊट गाईडची पथक, नगरपालिका विद्यालय पवनी विकास विद्यालयाचे स्काऊट गाईड पथक व बँड पथक उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार प्रमोद राऊत, नायब तहसीलदार किशोर राऊत शुभादा धुर्वे, अर्चना शहारे निरीक्षण अधिकारी, नत्थू शेंडे मंडळ अधिकारी, गोविंदा अंबुले, एन जे मसराम, पदम बोरकर, ग्राम महसूल अधिकारी.. रणजीत सव्वालके, संदीप मोट घरे, गिरीश मांढरे, भरत काळसरपे, रेहान सय्यद, विशाल जाधव, रुपेश बोंगिरवार, पुरुषोत्तम दुनियादारी,मीना कळंबे, महसूल सहाय्यक हिथेस बोधले, महेंद्र वाघमारे , अविनाश नेवारे, मेश्राम, गोस्वामी ,कोतवाल सुमित गिरडकर अमोल पंचभाई, विष्णू तुळसकर, प्रदीप भुरे, अक्षय भोवते, राकेश वरवाडे,ड्रायव्हर दिनेश पंधरे, शिपाई आवारी, वाणी, कळमकर, कलमलेजी, बावनकुळे. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!