विदर्भाची काशी पवनी नगरी - रोडांची दयनीय अवस्था; नगरपरिषदेवर नागरिकांचा संतापपवनी शहर बनले खड्ड्यांची राजधानी
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक. १४ ऑगस्ट २०२५
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनी नगरीतील नगरपरिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, पादचारी व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे रोजचे ये-जा करणे कठीण झाले असून, रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर, 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय व नगरपरिषद येथे ध्वजवंदनासाठी विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने जात असतात. मात्र, रस्त्यावरील खड्डे, उंचवटे व अडथळ्यांमुळे या मार्गाने जाणे हीच एक मोठी समस्या बनली आहे. पवनीचे रस्ते ‘माहेरघर’ समजूनच प्रवास करावा लागतो, अशी नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
नगरपरिषदेची ‘गाढ झोप’ व भ्रष्टाचारामुळे ही दयनीय परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यामध्ये यादव भोगे, राजेश नंदुरकर, फुंडे, उमाकांत राऊत, शारीक शेख, हरिचंद्र भाजीपाले, धनराज उपरीकर, अरुण आसाई, खालिद खान, महेश बोरकर, शुभम बावणे, युवराज करकाडे, हरीश तलमले, अविनाश टाकळीकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बेशरमच्या झाडांची लागवड करून नगरपरिषद पवनीचा निषेध नोंदवला.
नागरिकांच्या या आंदोलनामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पवनीच्या रस्त्यांची दुरवस्था हीच चर्चेचा प्रमुख विषय ठरली आहे. शेवटी प्राचीन काळी राजधानी ओळख असलेल्या शहराची ओळख खड्ड्यांची राजधानी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!