प्रहार जनशक्ती पक्षाकडून राष्ट्रीय मार्ग ३५३ ई वर चक्काजाम आंदोलन.. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव, मच्छिमार, तथा प्रहार कार्यकते, नागरिकांचा सहभाग..

प्रहार जनशक्ती पक्षाकडून राष्ट्रीय मार्ग ३५३ ई वर चक्काजाम आंदोलन.. 
 शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव, मच्छिमार, तथा प्रहार कार्यकते, नागरिकांचा सहभाग.. 



  वरोरा....जगदीश पेंदाम 

तालुक्यातील शेगाव बु. येथील बस स्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई  वर सकाळी १० वाजता प्रहार जनशक्ती पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
 निवडणुकीच्या काळात राज्य सरकारने केलेल्या घोषणांपैकी अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी,दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ, शेतमजूर, मच्छिमार यांचे प्रश्न अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी दिव्यांगमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे मार्गदर्शन मध्ये आज दि.२४ जुलै ला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांच्या मार्गदर्शनात शेगाव बु येथील बस स्थानकाजवळ राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर तसेच चंद्रपूर नागपूर राज्य वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे ठिकठिकाणी या सर्व मागण्या लवकर सरकारने मान्य करावे म्हणून चक्काजाम आंदोलन करण्यात आले.जवळपास दोन तास हे आंदोलन कण्यात आले होते.
आंदोलनाची सुरुवात सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य प्रदीपपाल चौधरी यांचे कीर्तनाणे करण्यात आली. असुन वरोरा , चिमुर महामार्ग  हा सुमारे २ तास आंदोलन कत्याकडून रोखून धरण्यात आला होता त्यावेळी काही तासासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधी नारेबाजी करत विधानभवनात ऑनलाईन जंगली रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री यांच्या विरोधात नारेबाजी करून राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात प्रहारचे जिल्हा प्रमुख शेरखान पठाण, सामाजिक कर्यकर्ते अभिजित पावडे, अक्षय बोंदगुलवार, अमोल दातारकर, राकेश भूतकर, अमित कोसुरकर, अमोल काळे, संदीप चौधरी, आकाश नाकाडे, गीता फुलकर, वैशाली घोडमारे, अंकिश निरजुळे,अजय ढोक, तसेच पक्षातील, समाजातील नागरिक शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधव, मच्छिमार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन स्थळी शेगाव पोलीस यांचे कडुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी ९ वाजे  पासूनच पुरुष पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी  तैनात करण्यात आले होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!