विज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
पिंपळगाव यथील घटना
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा पिंपळगाव येथील शेतकरी दिलीप गुलाब श्रीरामे वय ३५ वर्ष दिनांक.२३ जुलै २०२५ ला दुपारी शेताम मध्ये गेला असता अचानक आलेल्या पाऊसात अंगावर विज वडून मृत्यु झाला.सायंकाळी घरी न आल्याने नातेवाईकांनी शेतामध्ये जाऊन शोधाशोध केल्याने ही घटना उघड झाली.हि घटना भिसी पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा करून शव शव विच्छेदन करण्यासाठी चिमुर येथील उप जिल्हा रूग्णालय येथे नेण्यात आले.पुढील तपास भिसी पोलीस करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!