जखमी बंदरला करण्यात आले रेस्क्यू .. उपचारासाठी शेगाव वन विभागाच्या कार्यालयात..
जखमी बंदरला करण्यात आले रेस्क्यू ..
वरोरा...
तालुक्यातील शेगाव येथे आज सकाळी गावातील कुत्र्यांनी बंदराला जखमी केले असता रेस्क्यू करून पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून दवाखान्यात उपचार करण्यात आली असून जीवनदान देण्यात आले..
शेगाव या ठिकाणी नेहरू विद्यालय परिसरात गावातील काही कुत्र्याने बंदराला जखमी केले असल्याची माहिती पर्यावरण प्रेमी जगदीश पेंदाम,राकेश भुतकर यांना मिळताच लगेच वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांना देण्यात आली असता जखमी बंदराला पायाला गंभीर दुखापत झाली आहे, वनविभागाने रेस्क्यू करून त्याला शेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले असुन बंदराला वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांच्या मार्गदर्शनात शेगाव वन विभागाच्या देखरेखखाली पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले आहे, रेस्क्यू करताना वनरक्षक गजानन बोढे,वनमजुर आदी कर्मचारी उपस्थित होते...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!