मुंडाळा ग्रामसभेच्या सामूहिक वन क्षेत्रात TISS टीमची अभ्यास भेट: निसर्गसंवर्धन व रोजगार निर्मितीचा यशोगाथा
मुंडाळा ग्रामसभेच्या सामूहिक वन क्षेत्रात TISS टीमची अभ्यास भेट: निसर्गसंवर्धन व रोजगार निर्मितीचा यशोगाथा
चंद्रपूर | टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS), ग्रामसभा मुंडाळा (ता. सावली) द्वारा व्यवस्थापित सामूहिक वनहक्क (CFR) क्षेत्राला अभ्यासासाठी भेट दिली. या दौऱ्यात मनरेगा योजनेंतर्गत गावात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे निरीक्षण व चर्चा करण्यात आली.
ग्रामसभेने सामूहिक वनक्षेत्रात राबवलेल्या फळबाग व बांबू लागवड, वनतलाव, जैविक कुंपण, घनकचरा व गांडूळ खत व्यवस्थापन यांसारख्या पर्यावरणपूरक आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या उपक्रमांचे निरीक्षण संस्थेच्या पथकाने केले. हे उपक्रम गावातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार देण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, जंगल पुनर्जीवन व स्थलांतर थांबवण्यास मदत करत आहेत.
याप्रसंगी ग्रामरोजगार सेवक श्री. राजू बोरकर, CFRMC अध्यक्ष श्री. शेषराव गेडाम आणि मनरेगामध्ये कार्यरत मजुरांशी थेट संवाद साधून योजनांची अंमलबजावणी, अडचणी व यशस्वी बाबींचा आढावा घेण्यात आला.
TISS टीमने वन हक्क कायदा, मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी, नैसर्गिक समतोल राखणे, जल-मृदा संवर्धन आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी केलेले उपाय या मुद्द्यांवर चर्चा केली.
या अभ्यासदौऱ्यात TISS चे प्रतिनिधी शुभम वानखेडे, सौरभ काळे, यश, अमोल कुकडे, जगदीश डोळसकर, प्रवेश सुटे आणि नितीन ठाकरे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!