कुचकामी ठरते बीएसएनएल सेवा ☎️ -
☎️ कुचकामी ठरते बीएसएनएल सेवा ☎️
-===========================-
मूल शहरातील शेकडो ग्राहकांना बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक वर्षापासून देते आहे . अलिकडे अनेक महिन्यापासून मात्र ही सेवा पूर्णतः मोडकळीस आलेली असून सेवा सुरळीतपणे व अखंडित सुरू ठेवण्यासाठी कुणी वाली आहेत की नाही , असा प्रश्न निर्माण झालेलाआहे.
मोबाईलमध्ये बीएसएनएल चा सिम असेल आणि त्यावर काही काम करायचे असेल तर मुख्य म्हणजे कव्हरेजची पहिली समस्या निर्माण होते . एकतर पलीकडील व्यक्तीला लवकर जोडला जात नाही , जोडला गेला तर परस्परांचे बोलणे ऐकायला येत नाही . किंवा मधातच आवाज बंद होतो .
इंटरनेट चे काम करतांना कव्हरेज नसतो . नेटवर्किंगमध्ये अनेक अडथळे येतात . कोणत्याही फाईल्स लोड अथवा डाऊनलोड होत नाहीत .
एखाद्याला साधा " Hi. " जरी पाठवायचा असेल तरी 20 - 25 मिनिटे प्रयत्न करूनही पलिकडे जात नाही . कालचाच अनुभव . यापेक्षा आणखी जास्त काय बोलावे .
एवढी दयनिय आणि कुचकामी सेवा ग्राहक उपभोगत आहेत तरीही अत्यंत उच्च प्रतिच्या आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत असणाऱ्या यंत्रणेला कोणतीच सुचना मिळू नये . याचे नवलच वाटते .! !



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!