वृक्षारोपणाने साजरा झाला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ७२ वा वर्धापन दिन

पवनीत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला पर्यावरणपूरक उपक्रम

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त पवनी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हर्षल वाघमारे यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून वि. यु. क्रां. संघटनेचे जिल्हा प्रवक्ते चेतन जनबंधू, तसेच खादी ग्रामउद्योग समितीचे धर्मदास भांबोरे, देवराव पोवनकर, अहेमद हुसैन, सुजल उंदीरवाडे, हिताशू टेंभूरकर आणि तेजस खांदाडे हे उपस्थित होते. व कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे व्यवस्थापक कल्पना ईखार, शारदा पचारे आणि शालिनी शेंडे यांनी केले होते. या सर्वांनी आपल्या पुढाकाराने सामाजिक भान जपत समाजात पर्यावरण जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यावेळी बोलताना अध्यक्ष हर्षल वाघमारे यांनी सांगितले की, "पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढे यावे." चेतन जनबंधू यांनीही वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत "आज लावलेले रोपच उद्याच्या पिढीसाठी ऑक्सिजनचा स्रोत ठरेल," असे म्हटले.कार्यक्रमादरम्यान पवनी परिसरात विविध प्रकारची फळझाडे, छायादायक व औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले.शेवटी सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण करून पर्यावरणप्रेमाचे प्रतिकात्मक दर्शन घडवले आणि कार्यक्रम यशस्वीतेकडे वाटचाल करत संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!