आपला दवाखानाचे वतीने सिकलसेल जागृती शिबिर


मूल, 1 जुलै 2025:
सुभाष उच्च प्राथमिक शाळा, मूल येथे आज हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे वतीने सिकल सेल आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एक विशेष आरोग्य शिबिर (कॅम्प) आयोजित करण्यात आले.
शिबीरात डॉ. परिणीता सोंटक्के (वैद्यकीय अधिकारी, HBT, मूल), डॉ. निकिता जटाले (वैद्यकीय अधिकारी, UHWC 1), डॉ. ओंकार वरपलीवार (वैद्यकीय अधिकारी, UHWC 2), श्री. मुन्ना उराडे (MPW), सुश्री रोहिणी वाकुडकर (रक्तसंग्रह तंत्रज्ञ/Phlebotomist) उपस्थित राहून सेवा दिली.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच त्यांच्याकडून रक्ताचे नमुने (Sickling, CBC, TFT, Sr. Calcium, इ.) गोळा करण्यात आले.

"सिकल सेल जनजागृती कार्यक्रम" अंतर्गत आरोग्य तज्ञांनी विद्यार्थ्यांना या आनुवंशिक विकाराचे निदान, निवारण व उपचार याविषयी मार्गदर्शन केले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सिकल सेल आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याच्या नियमित निरीक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरला. शाळेच्या प्रशासनाने आयोजनासाठी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश जगताप सहाय्यक शिक्षक राजू गेडाम व इतर कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!