जन्मदात्या वडिलांनी केला सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार...

जन्मदात्या वडिलांनी केला सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार...
आईची  शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार..
अत्याचार केलेल्या वडिलाची कारागृहात रवानगी..


वरोरा... जगदीश पेंदाम

तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावात जन्म देणाऱ्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संताजनक घटना समोर आली आहे.
या संदर्भात आईने शेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलिसांनी पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला न्यायालयाचे आदेशानुसार कारागृहात  रवानगी करण्यात आलेली आहे
शेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी 17 वर्षाची असून बारावीत शिक्षण घेत आहे, आई घरी नसताना नराधम वडिलाने तिला जवळ बोलून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता मुलीने अतिप्रसंग सावधान बाळगत स्वतःचा बचाव करत घरातून बाहेर पळून गेली, सायंकाळी आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला असता आईने पतीला त्या संदर्भात विचारपूस केली असता पतीने पत्नी सोबत वाद घालत मारण्याची धमकी दिली  पिढीत मुलीचा आईने शेगाव पोलीस स्टेशन तात्काळ येवून संबंधित प्रकार सांगत रिपोर्ट दि. 17 जुलैला दिली आहे, शेगाव पोलिसांनी पास्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असुन जन्मदात्या आरोपी वडिलाला ताब्यात घेत न्यायालयात हजर करत न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात परवानगी केलेली आहे, या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात शेगाव पोलीस करीत आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!