माऊंट काॅन्व्हेंट अॅड ज्यु.काॅलेज ऑफ सायन्स शालेय विद्यार्थ्यांचा*पदग्रहण समारोह* पार पडला.




काल दिनांक 19/07/2025 ला माऊंट कॉन्व्हेंट अँड ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स, मूल येथे शालेय परिषदेच्या वेगवेगळ्या पदांवर निवडून आलेल्या विध्यार्थ्यांचा *पदग्रहण समारोह* पार पडला. संस्थेचे संस्थापक श्री. भाऊरावजी झाडें यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12/07/2025 ला प्राचार्या कु. रीमा कांबळे मॅडम यांच्या देखरेखी खाली शालेय परिषदेचे निवडणूक कडक बंदोबस्थात biolate पेपर वर घेण्यात आली. वर्ग 5 ते 12 पर्यंतच्या सर्व विध्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता आला. निवडणुकीची मतंमोजणी ही प्राचार्या कु. रीमा कांबळे मॅडम यांच्या देखरेखी खाली दिनांक 18/07/2025 पूर्ण करण्यात आली तसेच या निवडणुकीचा निकल आज दिनांक 19/07/2025 ला जाहीर करून पदग्रहण सोहळा पार पाडण्यात आला. पदग्रहण सोहळायला प्राचार्या कु. रीमा कांबळे मॅडम यांनी अध्यक्ष स्थान भूषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मूल नगर परिषद माजी नागराध्यक्ष सॊ. रत्नामाला प्र. भोयर, नवनियुक्त bjp मूल शहर अध्यक्ष श्री. प्रवीण ना. मोहुर्ले, तसेच सॊ. भरती राखडे मॅडम महिला जिल्हा प्रमुख शिवसेना ( शिंदे गट ) हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केली. विध्यार्थांनी मान्यवरांचे स्वागत गुलाब पाकळ्यांचा वर्षाव करून,स्वागतगीत गाऊन व सुंदर नृत्य सादर करून केले. मान्यवारणी आपल्या भाषणात विध्यार्थ्यांना लोकशाही आणि निवडणुकीचे महत्व पटवून दिले. पदग्रहण सोहळ्यात विविध पदांचे खाते वाटप करण्यात आले, यात विध्यार्थी प्रतिनिधी (मुलांचा )वेदांत आनंतुलवार तर विध्यार्थिनी प्रतिनिधी (मुलींची ) कु. सायली येनूरकर यांच्या गळ्यात विजयी माळ पडली. तसेच इतर पदे कु. तनवी भुरसे ( शैक्षणिक ), आरुषी भिमटे (सांस्कृतिक ), आरुषी नंनेवार (पालक सभा ), तुषार आंबटकर (खेळ ), सर्वेश मुप्पीडवर (आरोग्य ), सिद्धांत चलाख (वाहतूक ) यांनी पदभार स्वीकारले. कार्यक्रमाचे संचलन पलक काळे मॅडम तसेच, श्री. वामन कवाडकर सर,श्री. भूपेंद्र मोटघरे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उप मुख्याध्यापक श्री. अस्पाक सय्यद सर, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्री. दुष्यत गणवीर सर, प्रीती यामावार, अंशू येगान्टीवर, चैताली बावणे, सुनीता मोहबे, माधुरी पंधरे, रिंकू राठोड, हेमलता गेडाम, पायल शेंडे, इतर शिक्षक, ड्राइवर -कंडक्टर सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व वंदेमातरम गायनसह झाला. मान्यवरांनी विध्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन शाळेचा निरोप घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!