जनावर विक्री वरील अन्याय दूर करा ,मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन

जनावर विक्री वरील अन्याय दूर करा ,मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन 


वरोरा....जगदीश पेदाम

वरोरा तालुक्यातील व्यापारी व शेतकरी,पिढ्या न पिढ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल व म्हैस खरेदी विक्री करत आहे. परंतु ही जनावरे विक्रीस आणत असताना मार्गात आपल्यावर अन्याय होत असून हा अन्याय दुर करण्याची मागणी ऑल इंडिया जमियतूल संघटनेचे अध्यक्ष नबी कुरेशी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील १२५ व्यापारी आणि शेतकरी आज २० जुलै रोज रविवारला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 तालुक्यात वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात शेतकऱ्यांचे बैल व म्हैस विक्रीसाठी आणतात. या बाजारात व्यापारी पारंपारीक व कायदेशीर रित्या जनावरांची खरेदी विक्री करतो. यासाठी आवश्यक असणारे कृषि उत्पन्न बाजार समितीचे दाखले घेऊन पायी किंवा पिकअप वाहनामध्ये दोन,तीन नग घेऊन जातो. परंतु अलीकडे काही संघटना व व्यक्ती जाणीवपूर्व आमच्यावर कार्यवाह्या करत आहे. आम्हास रस्त्यावर अडवून जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करणे, मारहाण करणे तर कधी कधी मोबलिंचिंग सारखे गंभीर प्रकारही वाढले आहे. कधी कधी तर जनावर क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960,मोटर वाहन कायदा व गोवंश हत्याबंदी कायदा यांचा गैरवापर करून कायदेशिर व्यापार करणाऱ्या व्यापारी वर्गावर गुन्हे दाखल केले जातात. ही जनावरे जप्त करून गोरक्षण केंद्रात पाठविली जातात आणि न्यायालयीन आदेशानंतर ही ती परत दिली जात नाहीत. उलट ही जनावरे गोरक्षण केंद्रातून गायब होतात किंवा बेकायदेशीररीत्या विकली जातात. या सर्व बाबींवर आळा घालण्यासाठी आम्ही व्यापारी हे निवेदन लिहून देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा कृषि उत्पन्न समितीतील गुरांचा बाजार प्रसिदध असल्यामुळे येथे आमची जनावर मोठ्याप्रमाणात खरेदी विक्री होत असतात. बाजार समितीत जनावर आणत असताना प्रशासन व बजरंग दल सारख्या संघटना आपणास अडवत असल्याने  आपल्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर तोडगा काढून आपणास न्याय मिळवून द्यावा अशी विनंती या निवेदनाद्वारे केली आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!