शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले एकमेव लोकप्रतिनिधी!
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेले एकमेव लोकप्रतिनिधी!
आ. सुधीर मुनगंटीवार यांचे धाडसी पाऊल – कोरोमंडलवर पोलिसात थेट तक्रार
बल्लारपूर, ता. ५ जुलै २०२५:
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांचा आवाज बनणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट पोलिसांत तक्रार दाखल करणारे महाराष्ट्रातील कदाचित एकमेव लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार. कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या नामांकित खत पुरवठा करणाऱ्या कंपनीने शेतकऱ्यांवर रासायनिक खताबरोबरच अनावश्यक वस्तू खरेदीसाठी लादलेली सक्ती – हा प्रकार उघडकीस आणत आज त्यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात थेट लेखी तक्रार दाखल केली.
शेतकऱ्यांसोबत उभे राहण्याचा आदर्श उदाहरण:
राज्याचे माजी मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ निवेदन देऊन थांबण्याऐवजी, थेट पोलिसांत तक्रार करून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी कायदेशीर लढ्याचा बिगुल फुंकला आहे. कोरोमंडल कंपनी शेतकऱ्यांना डीएपी खतासोबत सल्फर, पीडीएम पोटॅश व १५:१५:१५ खत घेण्यास भाग पाडत होती. जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांचे निर्देश आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन नोटीसा असूनही कंपनीने शेतकऱ्यांचा आर्थिक छळ सुरूच ठेवला. हा अन्याय थांबवण्यासाठी मुनगंटीवार यांनी कठोर पाऊल उचलले आहे.
"जगाच्या पोशिंद्यांवर अन्याय नको!"
“मी कृषी विभागाचे सचिव श्री. विकास रस्तोगी यांची भेट घेऊन हा अन्याय स्पष्टपणे मांडला,” असे सांगून त्यांनी हा विषय केवळ जिल्हा पातळीपुरता मर्यादित न ठेवता तो मंत्रालयापर्यंत पोहोचवला. कोरोमंडल कंपनीचे विक्री उपप्रबंधक प्रितम सिंह यांच्यासोबतही थेट चर्चा करून "शेतकऱ्यांवर सक्ती करू नका," असा स्पष्ट संदेश दिला.
निष्कलंक नेतृत्वाचे सिद्ध उदाहरण:
कोरोमंडल कंपनीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवेळी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक अधिनियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करताना मुनगंटीवार यांनी यापुढे जर शेतकऱ्यांचे शोषण थांबले नाही, तर तीव्र आंदोलन हाती घेण्याचा इशाराही दिला.
शेतकऱ्यांसाठी कायदेशीर लढा – आश्वासक पाऊल:
ही तक्रार म्हणजे केवळ एक घटना नाही, तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उभ्या असलेल्या लोकप्रतिनिधीचा आवाज आहे. शेतकऱ्यांना “लिंकिंग”च्या जाचातून मुक्त करण्याचा निर्धार यातून दिसून येतो.
शेतकऱ्यांचा खरा कैवारी – सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सलाम!
त्यांच्या या धाडसी, प्रभावी आणि कायदेशीर लढ्याला आमचं ठाम समर्थन!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!