सावित्रीबाई फुले कन्या शाळेत 'दप्तरमुक्त शनिवार' उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी :- दि.०५/०७/२०२५ पवनी येथील सावित्रीबाई फुले कन्या शाळेत नुकताच 'दप्तरमुक्त शनिवार' हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी दप्तराविना शाळेत येत, शालेय जीवनातील एक वेगळा अनुभव घेतला.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रकट वाचन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची पुस्तके वाचून आपली वाचन संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांशी अधिक जवळून जोडले जाण्याची संधी मिळाली, ज्यामुळे त्यांच्यातील वाचनाची आवड वाढण्यास मदत झाली.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी विद्यार्थ्यांना नियमित वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांना सातत्याने वाचन करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागण्यास निश्चितच मदत होईल.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षक अशोक गिरी, सिद्धेश्वर फड, संदीप मुंडले, ललिता डेकाटे, नीता मोटघरे, हर्षा तलवारे, अरुणा कांबळे आणि मानसी ठवकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच 'दप्तरमुक्त शनिवार' हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायी आणि शिकण्यासारखा अनुभव ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!