मुंडाळा येथे वृक्षदिंडी - गाव हिरवेगार करण्याचा केला मानस
सावली - ग्रामपंचायत मुंडाळा च्या वतीने माझी वसुंदरा कार्यक्रमांतर्गत वृक्ष दिंडी कार्यकम गावात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून १२ हेक्टर सरकारी जागेत दहा हजार झाडे लावली आहे. त्यात जांभूळ, आंबा, काजू, पेरू आवळा, सीताफळ या फळझाडासह अनेक प्रजातीची झाडे आहेत. गावाने वृक्षारोपण संवर्धन चांगल्या पद्धतीने केल्याने नुकतेच टाटा सामाजिक संस्थेने भेट देत गावाचे कौतुक केले. गावात वृक्षदिंडी काढून आणखी रोपवन व संवर्धन करण्याचा मानस दिंडीतून केला. सदर कार्यक्रमाला पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी अशोक शिंदे, ग्रामसेवक कैलास फुलझेले, सरपंच उर्मिला बोरकर , क्षेत्र सहायक पेंढरी मेश्राम , वनरक्षक अहिरकर , शालिक पाटील भरडकर , अलका कावळे , जिल्हा परिषद शाळा मुंडाळा चे सर्व शिक्षक वृंद , गावातील शेतकरी व नागरिक , टाटा सोशल सायन्स इन्स्टिट्यूट चे ठाकरे, ग्रामरोजगार सहायक राजू बोरकर हे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!