भारपायली बंधारा ठरला त्या पाच गावांच्या रहदारीसाठी वरदान - "श्रीकांत"ने घेतला पुढाकार, श्रमदानाने झाला रस्ता तयार 🌼 सावली ते भारपायली मार्गे पायदळ व दुचाकीचा प्रवास सुखर

सावली - सावली ते चारगाव मार्गावरील नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरु असल्याने जुने पूल तोडण्यात आले व बाजूला पर्यायी रपटा बनविण्यात आला मात्र नदीत पाणी वाढल्याने हा रपटा वाहून गेला. मार्ग बंद झाल्यामुळे पायदळ प्रवाशांना वळण मार्गाने प्रवास करण्यासाठी फार कसरत करावी लागत होती ही बाब श्रीकांत बहिरवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पर्यायी मार्ग भारपायली बंधाऱ्यावरून रस्ता तयार केल्याने पायदळ व दुचाकीधारकांसाठी सोयीचा झाला आहे.

   चारगाव नदीवर ७ कोटी रुपयाच्या किंमतीचे पूल मागील वर्षीपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरु आहे. उन्हाळ्यात नवीन पुलाचे बांधकाम करतांना जुने पूल क्षतिग्रस्त करण्यात आले. तात्पुरता बाजूला रपटा बनविण्यात आला व तेथून रहदारी सुरु होती. नदीत पाणी जास्त आल्याने रपटा पाण्याखाली गेला असून मार्ग बंद झाला. चारगाव, भारपायली, मानकापूर, चक मानकापूर, मेटेगाव, सादागड, सादागड हेटी या गावातील नागरिकांना चिमढा, टेकाडी या १२ किमी अंतराच्या मार्गाने प्रवास करावा लागणार होते. ही बाब भारपायली येथील काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीकांत बहिरवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांचे लक्षात आणून दिली. दोघांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांना भारपायली बंधाऱ्यावरून पर्यायी मार्गाचा प्रस्ताव दिला व पाठपुरावा सुरु केला. एस. डी. मुलानी कन्स्ट्रॅक्शन कपंनीने सकारात्मकता दाखवून जेसीबी, ट्रॅक्टरद्वारे बंधाऱ्यासाठी माती पाठवली. दोन दिवस काम केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सायकल प्रवास, पायदळ व दुचाकी जाण्यासाठी मार्ग तयार झाल्याने त्या पाच गावातील नागरिकांच्या प्रवासाचा अंतर कमी झालेला आहे.

श्रीकांतसह युवकांनी केले रस्त्यासाठी श्रमदान

"एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ " असा विचार संत तुकाराम महाराजांनी दिला आहे. सार्वजनिक कामात विनामोबदला पुढाकार कोणी घेत नसतांना मात्र श्रीकांत बहिरवार हे बंधाऱ्यावरून रस्ता तयार करून जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी पुढे आले. त्यांनी बांधकाम कम्पनीसोबत संपर्कात राहून तीन दिवस काम पाहिला. काही ठिकाणी माणसानी काम करावा लागत असल्याने श्रमदान केले. या कामात त्यांना ग्रामपंचायत सदस्य श्रीधर मेश्राम, राकेश वरधलवार, गिरीधर वरधलवार, दसरथ मेश्राम, गणेश आडे, रमेश वरखडे, रुपेश सिडाम, अतुल मेश्राम, लक्ष्मण बुरीवार, विवेक प्रधाने, केवलदास कीटे, महेंद्र मेश्राम, गौरव चिलकलवार, अमर चिलकलवार सोमेश्वर गेडाम, मनोज दंडीकवार, सुनील दंडीकवार, योगेश दंडीकवार यांनी सहकार्य केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!