अनेक शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर
कृषी पंपाची लाईट सूरू करा चा शेतकऱ्यांनी दिला नारा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या डोमा, खापरी,कवडशी येथील अनेक शेतकरी कृषी पंपाच्या पडलेल्या पोल बाबत तक्रार घेऊन महावितरण कार्यालय चिमूर याठिकाणी अनेक शेतकरी धडकले नैसर्गिक आपत्तीमुळे कृषी पंपाचे पोल मोठया प्रमाणावर पडलेल्या अवस्थेत असल्याने शेतातील अनेक कृषी पंप बंद आहेत. यामुळे शेतीचा हंगाम सुरु असतांना देखील शेकऱ्यांना शेती करणे फार कठीण झाले असल्याने या त्रासाला कंटाळून महावितरण कार्यालयावर अनेक शेतकऱ्यांनी जमाव करून नारेबाजी करीत तात्काळ कृषी पंपाची लाईट सुरु करावी अशी मागणी केली. महावितरण कार्यालय उप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी चिमूर चे उप कार्यकारी अभियंता संजय जळगावकर यांनी येत्या १ ते २ दिवसात लाईट सुरु होईल अशाप्रकारचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!