सिंदेवाही ईको पार्क येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम.
(स्वाब फाउंडेशन व वन विभाग द्वारे वन महोत्सव कार्यक्रम)
सिंदेवाही:
शिंदेवाही येथील इको पार्क मध्ये 'स्वाब फाउंडेशन व वन विभाग' यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. हा कार्यक्रम वन महोत्सव निमित्याने वनपरिक्षेत्र सिंदेवाही मध्ये मा.अंजली सायंकार (बोरावार) मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही (प्रादेशिक) यांचे मार्गदर्शनाखाली वन महोत्सव 2025 कार्यक्रमांतर्गत 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत 100 विविध प्रकारची फळझाडे, रोपे लागवड करून वन महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी मुरमाडी येथील सरपंचा मैडम रुपाली रत्नावार, किन्ही येथील सरपंच भारत गेडाम, यश कायरकर अध्यक्ष स्वाब संस्था, रोषण धोतरे डब्लू. पी. एस.आय.,स्वाब संस्थेचे पदाधिकारी जीवेश सयाम नितीन भेंडाळे, जिवन गुरनूले, गणेश गुरनुले आदित्य नान्हे, राहुल गहाने, स्वराज मोहुर्ले, नितीन गडपायले क्षेत्र सहाय्यक सिंदेवाही, बी.डी. चिकाटे, वाय एम चौके क्षेत्र सहाय्यक, विवेक फुलझेले वनरक्षक, राहुल धनविजय, सचिन चौधरी ऋषी जावाडे कुमारी वाघमारे वनरक्षक लोणखैरी, चिकराम, वन रक्षक, संपूर्ण वन कर्मचारी,
वनमजूर मदतनीस पीआरटी चमू उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!