सिंदेवाही येथे वन महोत्सव कार्यक्रम

सिंदेवाही येथे वन महोत्सव कार्यक्रम
(वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.)    
  सिंदेवाही:
     देशभरामध्ये एक जुलै नंतर वन महोत्सव विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून वनविभागाद्वारे साजरा केला जातो. त्याच महोत्सवा निमित्याने वनपरिक्षेत्र सिंदेवाही मध्ये मा.अंजली सायंकार (बोरावार) मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही (प्रादेशिक) यांचे मार्गदर्शनाखाली तांबेगडी (मेंढा) उपक्षेत्रात वन महोत्सव 2025 कार्यक्रमांतर्गत 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत 100 विविध प्रकारची रोपे लागवड करून वन महोत्सव साजरा करण्यात आला. 
     यावेळी श्रीमान. एन.डब्लू.बुराडे क्षेत्र सहाय्यक तांबेगडी मेंढा, श्री पेंदाम वनरक्षक, श्री टेकाम वनरक्षक, श्री सोरते वनरक्षक, कु.किन्हेकर वनरक्षक, कु.गजभे वनरक्षक तसेच श्री स्मित कुमार वलादे सरपंच ग्रा.पं. तांबेगडी मेंढा, श्री विनोदजी कीचक उपसरपंच तांबेगडी मेंढा, श्री विजय जी ठीकरे सरपंच ग्रा.पं.चीकमारा, सौ प्रियंका ठीकरे पोलीस पाटील चिकमारा, श्री बंडूजी पेंदाम अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती चीकमारा व तांबे गडी मेंढा उपक्षेत्रातील वनमजूर मदतनीस पीआरटी चमू उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!