जिवनापूर टोला येथील शेतात विज पडून युवकांचा मुत्यू
तळोधी बा:- नागभीड तालुक्यात असलेल्या जिवनापूर टोला येथे मुसळधार पाऊस सुरु असताना मारोती अप्पकवार यांच्या शेतात धान रोव णी सुरु होती.व शेतात काम करीत असताना गणेश पांडूरंग वालके वय २८ वर्ष यांच्या अंगावर विज पडल्याने गंभीर जखमी झाले.जखमी अवस्थेत सिंदेवाही येथील दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले.डाक्टारानी तपासणी केल्यानंतर मुत् पावल्याचे सांगितले.मुतक गणेश यांची पत्नी कर्णाटक येथे रोव णी साठी गेली आहे.त्यांच्या निधनाने जिवनापूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.नागभीड तालुक्यातील विज पडून मुत्यू पावल्याची तिसरी घटना असल्यामुळे शेतकरी शेतमजूर वर्गात भिती चे वातावरण निर्माण झाले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!