नदीत पोहणे जीवावर बेतले - सावलीच्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू

 नदीत पोहणे जीवावर बेतले - सावलीच्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू 

सावली - सावली तालुक्यातील खेडी नदीत असलेल्या बंधाऱ्यात रविवारी ११ वाजताच्या दरम्यान तीन मित्र पोहायला गेले. त्यातील सोहम प्रमोद मोहुर्ले (वय १६) हा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. सोबतचे मित्र घाबरले त्यामुळे त्यांनी कुणालाच याबाबत माहिती दिली नाही. घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांची कसून चौकशी केली असता सायंकाळी त्या मुलानी घटनेची माहिती दिली मात्र पाण्याचा प्रवाह भरपूर असल्याने व रात्र झाल्याने शोध घेता आला नाही. सकाळपासून आपदा मदत टीमच्या माध्यमातून शोध सुरु असतांना सायंकाळचे सुमारास चांदली बुज. परिसरात मृतदेह सापडला. या घटनेमुळे मोहुर्ले परिवारात शोककळा पसरली आहे. खेडी पुलाजवळील बंधाऱ्यावर अनेक मुले पोहताना दिसतात त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी पोहायला जाण्यास टाळण्याचे आवाहन सावली पोलिसांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!