नाना सापडला! पोलिसांसमोर नवे आव्हान!
मुल शहरात गाजत असलेल्या भरती घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार असलेला नाना आक्केवार याला आज पोलिसांनी पहाटे चार वाजता कोनसरी येथून ताब्यात घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे.
यात घोटाळ्यातील एक आरोपी राजेश पुद्दटवार हे दोन दिवसांपूर्वीच मूल पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाले होते. त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी नाना आक्केवार मात्र पोलिसांना सापडला नव्हता. नाना आपल्या कोनसरी सासरच्या घरी लपून असल्याचे पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पहाटे चार वाजता त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
करोडोचा हा घोटाळा असून यात केवळ हे दोघेच सहभागी नसून मुलचे बडे राजकीय नेतेही यात सहभागी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मूळ आरोपी पर्यंत पोहोचणे हे मूल पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे, हे आव्हान मूल पोलीस पेलतील काय यावर चर्चा सुरू आहे.
दरम्यान भारतीय जनता पार्टीने या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!