वलनी शेत शिवारात पट्टेदार वाघाचा धूमाकुळ
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी तालुक्यातील वलनी शेत शिवारात पट्टेदार वाघाचा दैनंदिन धूमाकुळ असल्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या शेतीचे हंगाम सुरु असल्याने शेतकरी दैनंदिन शेतीची मशागत करणे व शेतात पेरणी करणे सुरु असून पवनी तालुक्यातील वलनी येथे आज दिनांक. २२/०६/२०२५ ला भोजराज पंढरी नखाते यांचे गुराच्या गोठ्यातून वाघाने एका अडीच वर्षाच्या गुराची शिकार केली असल्याने या नरभक्षी वाघाचा वनविभागाने बंदोबस्त करावा जेणेकरून शेती करणे सोपे जाईल या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पासरले आहे. मागील ३ दिवसात वाघाने पाच शिकार केली असतांना देखील वनविभागाची यंत्रणा शांत का आहे? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून शेतकऱ्याची झालेली नुकसान भरपाई देऊन वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!