सावित्रीबाई फुले कन्या शाळा,पवनी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजरा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - सावित्रीबाई फुले कन्या शाळा,पवनी येथे दि.२१ जून रोजी जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला.यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी योगाचे महत्त्व आणि त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीचे फायदे यावर मार्गदर्शन केले.तसेच विविध योगासने आणि प्राणायाम शिकविले. सूर्यनमस्कार, ताडासन,वृक्षासन, भुजंगासन यांसारख्या आसनांचा सराव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी, नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले, जेणेकरून विद्यार्थांना निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगता येईल.या उपक्रमामुळे विद्यार्थांमध्ये योगाविषयी जागरूकता वाढण्यास मदत झाली.तसेच उपस्थित सर्वांनी निरोगी व सुदृढ आरोग्य जपण्याचा संकल्प केला.यावेळी विद्यालयातील शिक्षक अशोक गिरी,सिद्धेश्वर फड,संदिप मुंडले,ललिता डेकाटे, नीता मोटघरे तथा विद्यार्थी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!