मंगरमेंढा येथे शेताची नुकसान करून बंधाऱ्याचे बांधकाम - शेतकऱ्याकडून नुकसान भरपाईची मागणी
सावली - शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, जलस्तर वाढावा या उद्देशाने बंधारा निर्मितीची कामे मंजूर होतात. मात्र या उद्देशाला हरताळ फासत कंत्राटदार व अधिकारी मिळून कोणाचे नुकसान होत आहे का याचा विचार न करता फक्त स्वहीत जोपासत कामं करीत असल्याचे मंगरमेंढा येथे शेतातील पाळे फोडून बंधारा बांधकाम केल्याचे प्रकरणावरून दिसून आले.
सावली तालुक्यातील मंगरमेंढा येथील मल्लीक राऊत यांचे शेताजवळ लघु सिंचाई पाटबंधारे उप विभागीय कार्यालय मुल अंतर्गत देशकर नामक एका ठेकेदाराला बंधाऱ्याची उंची बांधण्याचे काम दिले होते. काम करताना कंत्राटदारांनी शेतीची पाळ तोडून माती घेऊन बंधाऱ्याच्या कामात वापरली.सद्या पावसाळा सुरु झाल्याने शेतकरी मशागत करण्यासाठी गेले असता ही अडचण दिसून आले. कंत्राटदाराने आपले बंधारा बांधण्याचे काम केले.मात्र शेतकऱ्याच्या शेतीचे धुरे भरू दिले नाही. या बाबताची माहिती खुशाल लोडे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांचेकडे केली. शेताच्या बांधवर जाऊन चौकशी केली असता शेताचे धुरे तोडलेल्या अवस्थेत दिसून आले.लगेच संमधीत विभागाचे उपविभागीय अधिकारी रायपुरे यांचेशी मोबाईलद्वारे संपर्क करून हकीगत मांडली. या बाबत उप विभागीय अभियंता लघु सिंचाई जी प उप विभाग यांनी धुरे भरून दिले जाईल असे सांगण्यात आले. परंतु चार दिवसाचा कालवधी होऊनही ठेकेदार किंवा संबंधित अधिकारी येऊन पाहिनी करून केली नाही.तसेच शेतीचे पाळेधुरे भरून दिले नाही. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसाणीची जबादारी ही ठेकेदार आणि लघु सिंचाई उप विभाग जी प मूल यांची असताना शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचे शेतकरी मल्लिक राऊत व खुशाल लोडे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष , लुमाजी भोयर संचालक सेवा सहकारी संस्था सायखेडा, यशवंत मंगर, , विनोद राऊत आदीनी सांगितले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!