पोलिसानेच आरोपीकडून घेतली दहा हजार रुपयांची लाच
पवनी पोलीस स्टेशनला भ्रस्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल
पवनी तालुक्यात खाकी वर्दीची रंगली चर्चा
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर एकच चर्चा बघावयास मिळत आहे. पवनी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे अजित प्रल्हाद वाहने वय ३७ वर्षे पद पोलीस नाईक बक्कल नंबर १२०९ नेमणूक पोलीस स्टेशन पवनी राहणार नेताजी वार्ड कुंभार मोहल्ला सूर्यभान वखाडे यांच्या घरी किरायाने राहात असून मूळ पत्ता ग्राम गुरढा, तालुका लाखनी जिल्हा भंडारा असे असून पोलीस स्टेशन पवनी येथेच दिनांक.१३/०६/२०२५ रोजी घटना वेळ १३:४८ ते १४:२० वाजताच्या दरम्यान १०,००० रुपये लाच स्वीकारल्याची तक्रार फिर्यादी नामे मनोज दशरथ सेलोकर वय २५ वर्षे राहणार मांगली तालुका पवनी जिल्हा भंडारा यांनी दाखल केली आहे. तर आरोपी विरुद्ध भ्रस्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व आरोपी पोलीस यांचेकडून (१) दोन ३२ GB sandisc micro SD मेमरी कार्ड
(२) एक सॅमसंग गॅलेक्सी A २३ 5ग अँड्रॉइड स्मार्ट मोबाईल फोन किंमत १०,००० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपी पोलीस नाईक यांनी पदाचा दुरुपयोग करीत स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता तक्रारदार यांचा भाऊ दिनेश उर्फ फिरोज सेलोकर याचा तडीपार कालावधी संपत असल्याने त्यास भंडारा जिल्ह्यात बोलावून घेण्याकरिता व त्यांचेवर यापुढे तडीपार किंवा कोणतीही कार्यवाही न करण्याकरिता १०,००० /- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यासाठी तयारी दर्शविल्याने व सापळा कार्यवाही दरम्यान यातील आरोपी लोकसेवक यांना फिर्यादी याचेवर संशय असल्याने फिर्यादी यांचेकडून लाच रक्कम स्वीकारली नसल्याने आरोपी लोकसेवक यांनी फिर्यादी यांना लाच रक्कम मागणी केल्याचे आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे फिर्यादी यांचे फिर्याद वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तर पुढील तपास पोलीस उप निरीक्षक निखिल अरविंद रहाटे करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!