गुणवत्ता कायाकल्प कार्यक्रमात चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-सावरी,आरोग्य उपकेंद्र - अमरपूरी चा जिल्ह्यात चौथा क्रमांक

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - २०२४-२५ वर्षातील गुणवत्ता कायाकल्प पुरस्काराची नुकतीच घोषणा झालेली आहे त्यात चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र-सावरी,उपकेंद्र - अमरपूरी चंद्रपूर चा जिल्ह्यातून चौथा क्रमांक पटकाविला. 
२०२४-२५ या वर्षात एनक्युएएस राज्यस्तरीय मूल्यांकनासाठी चिमूर तालुक्यातील निवडलेल्या  प्राथमिक आरोग्य केंद्रातून अमरपूरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र राज्यस्तरिय मूल्यांकनासाठी सध्या तयारी सुरू
आहे.चिमूर तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामार्फत नागरिकांना दर्जेदार व गुणवत्ता पूर्वक आरोग्य सेवा देण्याचे हे फलित असून उर्वरित उपकेंद्र व आरोग्य संस्था यांना सुद्धा पुढील वार्षिक सत्रात गुणवत्ता कार्यक्रम अंतर्गत एनक्युएएस किंवा कायाकल्प पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्य करीत आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहनिश गिरी अमरपूरी उपकेंद्रमार्फत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत राहु वैद्यकीय अधिकारी डॉ.कौशिक देहारी अमरपूरी उपकेंद्रमार्फत नागरिकांच्या आरोग्य सेवेत तत्पर राहू.आरोग्य सहाय्यक अनिल भिडेकर ,आरोग्य सहायिका श्रीमत उज्ज्वला चिकाटे, आरोग्य सेविका कु.पुष्पा नागपूरे, आरोग्य सेवक विठ्ठल मुंडे,आरोग्य सेवक प्रविण वाघमारे यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!