सावली तालुक्यात हत्तीच्या कळपाचा धुमाकूळ - मका व धान पीक उध्वस्त
सावली - तालुक्यात हत्तीच्या कळपाचा शिरकाव झाला असून शेतात काढून ठेवलेला मका व उन्हाळी धान पीक उध्वस्त केल्याने अगोदरच अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यास दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
मागील काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा कळप मोठ्या प्रमाणात उपद्रव माजवत असुन या हत्तींना प्रती बंध करण्यासाठी वनविभाग हतबल झालेला आहे, मागील दोन वर्षांपासून चंद्रपूर वन विभागाच्या सावली वनपरिक्षेत्रातील वैनगंगा नदीकाठावरील गावांना सुध्दा आपले लक्ष्य केले आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठे नुकसान होत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गडचिरोली वनविभागाच्या पोर्ला वनपरिक्षेत्रा मधील काटली साखरा वन क्षेत्रात संचार करीत असलेल्या तीस ते बत्तीस संख्येतील रानटी हत्तींचा कळप वैनगंगा नदी ओलांडुन विहीरगाव शेत शिवराकडे येत असल्याची माहिती साखरा येथील नागरीकांनी विहीरगांवच्या शेतकऱ्यांना दिली, सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. सध्या मक्का व धान पिक काढणीला आली आहेत, निसर्गाच्या प्रकोपातुन उरलेल्या पिकांची काढणीची लगबग असल्याने काही शेतकऱ्यांनी मक्का तोंडुन शेतात सुकविण्यासाठी ठेवलेला आहे, तर धान पिके कापण्याच्या प्रतीक्षेत आहे.विहीरगाव येथील शालीक वाकडे, मुखरु वाकडे यांच्या शेतात काढलेला मक्का हत्तींनी फस्त केला व धान पिकांस तुडविले तसेच विठ्ठल वाकडे, बेबी वाकडे, रवी वाकडे, हीराजी वाकडे,मधुकर वाकडे,व शकुंतला नथ्थुजी नागोसे यांच्या शेतातील धान पिके तुडवल्याने शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. मागील पंधरवाड्यात वादळी पाऊस व गारपीटीने पिकांस फटका बसला होता ,दरम्यान याच परिसरात पट्टेदार वाघाचा संचार असल्याने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढवले. पीक काढणीला आल्यावर रानटी हत्तींचा शिरकाव झाल्याने येथील शेतकरी तीहेरी संकटात सापडला आहे. हत्तीच्या प्रवेशाची माहीती मिळाताच सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात वन कर्मचारी गावक-यांसह रात्रभर लक्ष ठेवुन होते. मात्र शेतपिकाचे नुकसान हतीच्या कळपाने केले असल्याने नुकसान भरपाईची व हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!