मानव वन्यजीव संघर्ष होऊ नये यासाठी गावा गावात दिली जात आहे मुनारी

वन विभागाणी वाढवल्या जंगलामध्ये गस्ती

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन करतांना चार जणांचा जीव गेला असून मानवी संघर्षात वाढ होताना दिसत आहे.आज मुल तालुक्यातील भादुर्ली येथील एका महिलेचा वाघाने बळी घेतलेला आहे याचीच खबरदारी घेत वनपरिक्षेत्र कार्यालय खडसंगी अंतर्गत येत असलेल्या जंगलात लगत गावातील बरळघाट पांढरपौणी, वाहनगाव,बोधली निमढेला, बेंबळा, वायगाव (खड ) झरी जामणी आदी गावा मध्ये वनविभागामार्फत मुनारी देऊन जंगलामध्ये पाई गस्त, चारचाकी वाहन द्वारे गस्त विभागांनी केली आहे ही गावे बफर लगत असून मानव वन्यजीव संघर्ष घडू नये यासाठी विशेष खबरदारी वन विभागाकडून घेण्यात येत आहे.  तसेच वरोरा वनपरक्षेत्र कार्यालय अंतर्गत परिसरातील जंगलामध्ये संकलन करताना जंगलातील पानवट्याकडे जाऊ नये तसेच जंगलामध्ये झुंड करून जाऊन तेंडू पत्ता संकलन करावे असे वनविभागामार्फत जनतेला सूचना देण्यात आल्या आहे. आजच्या घटनेला पकडून चंद्रपूर जिल्ह्यात सतरा लोकांचा बळी गेला आहे सर्वात जास्त घटना ह्या जंगलामध्ये गेल्याने होत असल्याने तेंदूपत्ता संकलन चंद्रपूर जिल्ह्यातला बंद करावा अशी मागणी करायला काही हरकत नाही? दिवसेंदिवस चंद्रपूर जिल्ह्यातला मानववन्य जीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे दररोज वाघाने जाणाऱ्या बळीमुळे वन्यप्राणी व निसर्गा विषयी जनतेच्या मनात असंतोष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे जंगलावर आधारितच रोजगार ही संकल्पनाच योग्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे.वनविभागाकडून अधिकच्या सूचना दिल्या जात असून जंगलात एकट्याने जाऊ नये,सकाळी लवकर तसेच संध्याकाळी उशिरा जंगलात जाणे टाळावे, नेहमी समूहाने जंगलात जावे एकमेकाशी संपर्क ठेवत राहावे, कोणताही आवाज हालचाली तसेच संजयस्पद गोष्ट जाणवली तर तात्काळ सावधगिरी बाळगावी, जंगलात वन्यप्राण्यांचा संभव धोका लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी खबरदारी घ्यावी, जंगलात आग लावू नये, आवश्यक असल्यास मोबाईल फोन, शिट्टी जवळ ठेवावी, जेणेकरून बदलीसाठी इतरांना बोलवण्यास सोयीस्कर होईल, चंदू पत्ता तोडताना झाडावर न चढता जनी जमिनीवरची पाणेच गोळा करावीत, मुलांना जंगलात नेऊ नये, कोणताही अपघात तसेच गंभीर घटनेची तात्काळ माहिती जवळच्या वनविभाग कर्मचाऱ्यांना देण्यात यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!