स्वाब नेचर केअर संस्थेला बाबुराव तुकाराम लोनबले स्मृती पुरस्कार

स्वाब नेचर केअर संस्थेला बाबुराव तुकाराम लोनबले स्मृती पुरस्कार

  तळोधी (बा.):  
   नागभिड तालुक्यातील कन्हाळगाव (सोनुली) येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापक, बाबुराव तुकाराम लोनबले यांचे स्मृती प्रित्यर्थ, सदर पुरस्कार वितरण रविवार  दिनांक ११ मे २०२५ ला संपूर्ण ब्रम्हपुरी वन विभागातील नागभीड, सिंदेवाही,चिमुर, ब्रम्हपुरी तालुक्यात पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या 'स्वाब' नेचर केअर फाऊंडेशन च्या कार्याची दखल घेऊन या संस्थेला  पुरस्कार देण्यात आला. 
       यावेळी हरिभाऊ पाथोडे यांनी विविध विषयावर मार्गदर्शन करताना संस्थेच्या कार्याची माहिती देत "या परिसरात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून या परिसरात कुठल्याही मानधन किंवा आर्थिक मदत न घेता सतत मार्गदर्शन कार्यक्रम, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, वन्यजीव संरक्षण, सोबतच नैसर्गिक आपदेच्या वेळी शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे उल्लेखनीय काम हे संस्थेचे स्वयंसेवक करतात. त्यामुळे या पुरस्काराचे मानकरी आहेत." असे सांगितले.
    तर संस्था अध्यक्ष यश कायरकर यांनी मानव वन्यजीव संघर्ष आणि वाघ या विषयावर मार्गदर्शन करताना पुरस्कार संदर्भात बोलताना " या पुरस्काराचे खरे मानकरी संस्थेचे संपूर्ण सहकारी आहेत. या पुरस्काराने आमच्यात नवीन चैतन्य निर्माण होते, आणि यातून इतरांना सुद्धा प्रेरणा मिळते." या पुरस्कारा बद्दल लोनबले परिवाराचे आभार मानले.
                    हा बांबु पासून बनवलेले सुंदर स्मृती चिन्ह व रोख स्वरूपातील हा पुरस्कार प्राचार्य डॉ.नामदेवराव कोकोडे, समाजसेविका अभिलाषा गावतुरे, अभाअंनिसचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, संजय घोनमोडे यांचे हस्ते देण्यात आला. या प्रबोधन मेळाव्याचे आयोजक अनिल लोनबले यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, सर्पमित्र जीवन गुरनुले, गणेश गुरनुले, शरद गभने, आदित्य नान्हे, अमिर करकाडे, शुभम निकेशर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. राजश्री वसाके यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोरशाह आत्राम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!