ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारा विरूद्ध महिला आक्रमक

शेगाव बु ग्रामपंचायत ला महिलांनी लावले कुलूप 

संतप्त महिला यांनी पोलीस स्टेशन येथे पोहचून मांडला ठिय्या 

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव बु ग्रामपंचायत ही वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेचा विषय ठरत असते. यातच मागील महिना भरापासून नळाला पाणी येत नसल्यामुळे गावातील महिला अधिकच आक्रमक झाल्या होत्या. संतप्त महिलांनी सकाळी ग्रामपंचायतला घेराव घालून शेगाव सरपंच यांना विविध प्रश्न केले परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप लावून सरळ शेगाव पोलीस स्टेशन गाठले त्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन यावर कारवाईची आश्वासन देत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशन मधला ठीया हटवणार नाही अशी आक्रमक भूमिका महिलांनी घेतलेली होती. त्यानंतर शेगाव पोलिसांचे ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांनी वरोरा सर्कल चे बीडीओ मुंडकर यांना फोन द्वारे संपर्क केला असता मी रजेवर असून इतर अधिकारी यांना पाठवतो असे सांगून त्यांनी विस्तार अधिकारी, व पाणी पुरवठा जल जीवन इंजिनियर वसरोरा सर्कल यांना पाठवले. विस्तार अधिकारी  आल्यानंतर महिलांनी त्यांना घेराव घातला व ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराचा जणू पाढाच वाचनात सुरुवात केली . त्यानंतर विस्तार अधिकारी माधुरी येरणे, विस्तार अधिकारी प्रणव बक्षी, पाणी पुरवठा जल जीवन इंजिनिअर मोना कपाटे यांना गावातील महिला व पोलीस प्रशासन सोबत घेऊन संपूर्ण गावातून पायदळ फिरवत आठवडी बाजारात घडलेला भोंगळ कारभार,  गावातील नाल्यांची असलेली दुरावस्था,  नाल्यामध्ये असलेला कचरा रस्त्याची असलेली दुरावस्था,  हर घर नळ योजनेमध्ये गावातील रस्त्याचे वाचलेले तीन १३ तसेच गावातील विविध समस्या व खास करून गावातील नळाला महिन्यातून एक किंवा दोन वेळा येणारे पिण्याचे पाणी त्यातही ते पाणी शुद्ध मिळत नसल्याचे विविध समस्यांचे निवेदन विस्तार अधिकारी यांना देण्यात आले विस्तार अधिकारी यांनी स्वतः डोळ्यांनी सगळं पाहिल्यानंतर संबंधित निवेदनावर लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिल्यानंतर गावातील महिलांनी काढलेला मोर्चा मागे घेण्यात आला.गावातील सगळ्या समस्या या मी स्वतः पायदळ फिरून बघितल्या आहे. व या विषयी मला गावकऱ्यांनी निवेदन सुद्धा दिले असून हे आम्ही वरिष्ठाकडे पाठवून योग्य ति चौकशी केली जाईल व त्या नुसार कारवाई केली जाईल. अशे मत विस्तार अधिकारी माधुरी येरणे पंचायत समिती वरोरा यांनी सर्वांसमोर मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!