घरकुल धारकांना जवळील नदी नाल्यावरून रेती पुरवठा करण्यात यावा प्रहार जिल्हा प्रमुख यांचे तहसीलदार यांना निवेदन

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - भद्रावती तालुक्यातील घरकुल धारकांना सरकारने विनामूल्य ५ ब्रॉस रेती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत रेती लाभार्थ्यांना सुद्धा जिल्हा कार्यालय कडून परवाने प्राप्त झाले असुन तालुक्यातील घरकुलधारकांना घरकुल धारकांना ६० ते ७० किलोमिटर या अंतरावरून केळी या गावा वरून रेती आणण्याचे परवाने देण्यात आले.मात्र घरकुल धारकांना इतक्या अंतरावरून रेती वाहतूक गाडी भाडे परवड नसून घरकुल धारकांना आर्थिक पैश्याचा भुर्दंड बसायला नको या करिता वरोरा - भद्रावती तालुक्यातील गावाजवळील नदी नाल्याचे रेती साठे आहेत त्या ठिकाणावरून रेती आणण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी घरकुल धारकांनी केली आहे.शेगाव बु,चारगाव खुर्द, वायगाव भो, बेंबळा, राळेगाव, चारगाव बु, दादापुर, धानोली अश्या अनेक गावातील धारकांना केळी या गावातून रेती आणण्याचे परवाने दिले असून ते  परवाने रद्द करून भद्रावती- तालुक्यातील आष्टा,परोधी तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव खुर्द, अर्जुनी, बेंबळा, येथील नदी,नाल्यातील असणाऱ्या रेती साठ्याची परवानगी अवघ्या १० दिवसात देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांनी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास केळी येथील दिलेल्या परवण्याचा निषेध म्हणून आपल्या कार्यालयात परवान्याची होळी पेटविण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी भारत जीवतोडे,विनोद रणदिवे, ताराचंद कन्नाके,बाबा सरपाते, देवराव गायकवाड, आनंदराव कापटे, अशोक कंडे असे अनेक घरकुल लाभार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!