अखेर चिमूर शहरातील आठवडी बाजाराला मिळाले अडचणीचे स्थान

प्लास्टिक मुक्त करण्याच्या नादात मागणी नसतांना देखील नगर परिषदेने केला हजारोंचा खर्च 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर भरत असलेला शुक्रवारचा आठवडी बाजार अखेर गेला शहराच्या एका कोपऱ्यात त्यामुळे बाजार करण्याकरिता जाणाऱ्यांची झाली फजीती. पहिल्याच दिवशी नागरिकांची बाजारात खरेदी करण्यासाठी  अफाट गर्दी झाली होती गर्दी सांभाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्लास्टिक मुक्त चिमूर करण्याकरिता व जनतेला संदेश देण्याकरिता नगर परिषद चिमूर मार्फत कापडी पिशव्या चे वाटप करण्यात आले. हि संकल्पना खूप छान आहे परंतु उपक्रम राबविलाच पाहिजे असे आवश्यक नसतांना देखील नगरपरिषदेने दाखविण्यापुरताच हजारोंचा खर्च करून कापडी पिशव्या वाटप आणि जाहिरातीवर खर्च केला. याप्रकारचे कार्यक्रम राबविल्याने प्लास्टिक बंद होणार का? असे आठवडी बाजारात व्यापारी ग्राहकांशी बोलतांना दिसत होते.एकीकडे कंपनीचा प्लास्टिक पिशवी तयार करण्याचा सपाटा जोराने सुरु असतांना मंत्री - संत्री यांना बंद करण्याचा निर्णय का घेत नाही? तर कमी मायक्रोन च्या पिशव्या वापरण्यास बंदी आणि जास्त मायक्रोन च्या पिशव्या वापरण्यास सूट अशाप्रकारे निर्णायक भूमिका अयोग्य आहे. जेणेकरून कंपनीवरच कठोर निर्णय लादले असते तर याप्रकारची भूमिका नगर परिषदेला राबवावी लागली नसती."खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" याचे वापर योग्य आहे परंतु बघावे तर चिमूर नगर परिषद क्षेत्रात सार्वजनिक स्त्री - पुरुष मुत्रीघर नाही? सुलभ शौचालय नाही? यावर पैसा खर्च करणे अत्यंत महतत्वाचे आहे. शहरात कुठेही स्वच्छता नाही. देखव्या पूर्ती जनतेला त्यांच्या फोटो सह स्वच्छ भारत मिशन अभियानाची जाहिरात करणे आणि नगर परिषदेची खोटी पासिद्धी करणे हे योग्य नाही. पुरेपूर शहराचा आढावा घेऊन स्वच्छता मोहिम राबवून पुढील निर्णय घेणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!