दहावी-बारावी निकालाची तारीख जाहीर; विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली

दहावी-बारावी निकालाची तारीख जाहीर; विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली
निकालाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षाफळ जाहीर करण्यासंदर्भात मंडळाकडून स्पष्टता


मुंबई (प्रतिनिधी) –
राज्यातील लाखो दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल ५ मे रोजी आणि दहावीचा निकाल ५ ते १० जूनदरम्यान जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची निकालाबाबतची तणावपूर्ण प्रतीक्षा आता संपणार आहे.


बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात, तर दहावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चदरम्यान पार पडल्या होत्या. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून सुमारे १५ लाख तर दहावीला १६ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. परीक्षा सुरळीत पार पडल्यावर आता सर्वांचे लक्ष निकालाच्या तारखेवर होते.

"निकाल प्रक्रियेस अंतिम टप्प्यात आणले गेले असून, बारावीचा निकाल १५ मेपर्यंत ऑनलाइन जाहीर करण्यात येईल. दहावीचा निकाल मात्र थोडा उशिराने, ५ ते १० जूनदरम्यान प्रसिद्ध केला जाईल," असे शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपले गुण तपासता येतील. पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, निकालाच्या तारखेबाबत साशंकता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र आता अधिकृत माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांना मानसिक दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. अनेकांनी पुढील करिअर नियोजन, प्रवेश अर्ज यासाठी तयारी सुरू केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!