पवनीच्या अषित प्राथमिक शाळेत ६६ वा महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक. ०२/०५/२०२५ पवनी येथील अषित प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात ६६ वा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी संतोष धांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राकेश बिसने यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद केले. शिक्षक प्रयागराज भोयर आणि मुरलीधर जिवतोडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका विजुमाला साखरकर,करुणा वाघमारे,सविता राऊत यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी संतोष धांडे यांनी आपल्या मार्गदर्शनातुन महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचा उल्लेख केला.त्यांनी विद्यार्थ्यांना राज्याच्या विकासात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी केले,ज्यामुळे कार्यक्रमात एक विशेष रंगत भरली होती. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता आणि त्यांनी ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.अषित प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!