सिनेस्टाईल ने पाठलाग करून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई

चिमूर तहसीलला ट्रॅक्टर जप्त 

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियांचा धुमाकूळ सुरु असून महसूल पथक ऍक्शन मोडवर आली असल्यामुळे दिनांक.२९ एप्रिल २०२५ ला रात्री १२ ते १ वाजे दरम्यान १ ट्रॅक्टर सोनेगाव सिरास ते चिमूर मार्गावर अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असतांना पकडले तर ३ ट्रॅक्टर उपजिल्हा रुग्णालय समोरील पाणी फिल्टर जवळील उमा नदी पात्रातून रेती भरत असतांना महसूल पथकाने पकडली असून चारही ट्रॅक्टरवर चिमूर तहसीलला जप्तीची कारवाई करण्यात आली. हि कारवाई तलाठी  मेहरकुरे,चिडे, घोडघासे, मुंदे,पाटील व अन्य कर्मचारी यांनी मिळून केली असता सुद्धा रेती माफियामध्ये कसल्याही प्रकारचे भीतीचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसून येत नसून सर्रास बिनधास्तपणे अजूनही रेतीची तस्करी आणि वाहतूक तालुक्यात  सुरुच असल्याचे दिसून येत आहे.या माफियांना आशीर्वाद तरी कुणाचे अशी जनतेत मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!