अवैधरित्या देशी-विदेशी दारु वाहतुक करणाऱ्या वाहनावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची धडक कारवाई
पोलीस स्टेशन चिमुर हद्दीतील घटना
दारुच्या ५३० पेटयावर जप्तीची कारवाई
सावधान तुम्ही जहर पीत आहात
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - दिनांक.१ मे २०२५ रोजी एक आयशर ट्रक चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून अंवैधरित्या देशी - विदेशी दारुची वाहतुक गडचिरोली जिल्हयात करणार आहे अशा खात्रीशिर माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पथके तयार करुन पोलीस स्टेशन चिमुर हद्दीत मौजा शिवापूर बंदर परिसारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ ई या रोडवर प्राप्त माहीती नुसार आयशर ट्रक नंबर. CG 08 AY 9948 यास थांबवून विचारपूस केली असता (१) वाहन चालक नामे विशाल कमलदेव उईके वय २७ वर्ष, रा.पाथरी, ता.साकोली, जि.भंडारा व त्याचे साथीदार (२) पप्पू परसराम वाधाडे वय
२० वर्ष, रा. बोदरा, ता.साकोली, जि.भंडारा आणि (३) सुरेश बंडुजी युवनाते, वय ५० वर्ष,रा.नारी रोड, टेकानाका, संदयालनगर, नागपूर असे असल्याचे सांगितले. सदर वाहनाची झडती घैतली असता त्यात अवैध रित्या देशी-विदेशी दारू लपवून वाहतुक करण्यासाठी पिवळया रंगाचे प्लास्टिक बोऱ्यामध्ये सोयाबीन वडया तसेच भांडे घासणीचे बॉक्स दिसुन आले. त्यापलीकडे लाकडी फळ्या लावून कप्या तयार केल्याचे दिसुन आले असुन त्यामध्ये रॉकेट देशी दारू
संत्रा ९० ML. एकुण पेटया ३५०, किंमत. १२,२५,०००/- रू., रॉयल स्ट्रॉंग कंपनीची विदेशी दारू १८० ML एकुण ९० पेट्या किंमत.११, २३,२००/- रू. तसेच हॉवर्ड ५००० बियर एकुण ९० पेट्या किंमत.३,४५,६००/- रू. व आयशर ट्रक क्रमांक.CG08-AY-9948 किंमत. २०,००,०००/- रू.असा एकुण ४६,९३,८००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग, चिमुर उपविभाग चंद्रपूर यांचेकडुन रॉकेट देशी दारु संत्रा ९० ML अशा एकुण पेट्या ३५० या मालाची पाहणी अहवाल घेतला असता सदर रॉकेट देशी दारू संत्रा ३५० पेट्या या बनावट दारू असल्याचे निष्पन्न झाले आहे.यावरुन नमुद वाहन चालक (१) विशाल कमलदेव उइके व त्याचे साथीदार नामे (२) पप्पु परसराम वाधाडे.(३) सुरेश बंडुजी युवनाते (४) विशाल जांभुळकर यांचे विरुध्द पोलीस स्टेशन चिमुर येथे गुन्हा नोंद करण्यायात आला आहे.
सदरची कारवाई स्यानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर व राज्य उत्पादन शुन्क विभाग,चंद्रपूर यांचे उपस्थितीत
करण्यात आली आहे. हि कारवाई सुदर्शन मोमक्का, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात सपोनी बलराम दिपक कांकेडवार, सपोनी बलराम झाडोकार, पोलीस उप निरिक्षक संतोष निंभोरकर, स.फौ. स्वामीदास चालेकर , पोहवा गनेश
मोहूर्ले, पोहवा नितीन साळवे, जयंता चूनारकर, जयसिंग, प्रकाश बल्की, संजय वाढई, नितीन कुरेकार, अजय
बागेसर, नापोअ संतोष येलपुलवार, पोअं गपेश भोयर, गोपीनाथ नरोटे, गोपाल अतकुलवार,प्रदिप मडावी, प्रसाद धुळगंडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंदपूर यांनी मिळून हि कारवाई केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!