ग्रामपंचायत गाळ्यातच होते दारू विक्री
मागील कित्तेक वर्षा पासून सुरु असलेल्या अवैध दारू व्यवसायाला अभय कुणाचे
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालूकात सध्या सर्वत्र अवैध धंद्याना मोठ्या प्रमाणात उत आलेला आहे.परंतु कारवाई मात्र होताना दिसतच नाही. यातच तालुक्यातील आजनगाव येथे मागील कित्तेक वर्षा पासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय राजरोसपने सुरु आहे. पण याकडे वरोरा पोलीस हे कोणतीही कारवाई करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणेज हा व्यवसाय हिंगणघाट येथील एक इसम मागील कित्तेक वर्षा पासून ग्राम पंचायत गळ्यामध्येच करत असल्याचे गावातील स्त्रिया सांगत आहे. मात्र या अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई मात्र होत नसल्या कारणांनी या व्यक्तीची हिम्मत अति जास्त प्रमाणात वाढलेली असून आमचे सहकारी पत्रकार यांनी त्याला जाब विचारला असता तुझ्यानी होते ते करून घे अशा अरेरावीच्या शब्दात त्यांनी उत्तर दिले त्यामुळे एवढि हिम्मत यांची वाढते तरी कशी? एवढि हिम्मत होत पर्यंत यांना प्रशासनाचा काहीच धाक उरलेला नाही का? पोलीस प्रशासना सोबत यांचे काही साटेलोटे तर नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न मात्र या गावातील नागरिकांच्या मनात या घटनेमुळे निर्माण होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!