चंद्रपूर जिल्ह्यातून तलाठी प्रविण ठोंबरे यांची आदर्श पुरस्कार करीता निवड
जिल्हाधिकारी यांचे हस्ते होणार पुरस्कार वितरित करून सत्कार
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - शासनातर्फे देण्यात येणारा आदर्श तलाठी पुरस्कार सन २०२४ - २०२५ करीता चंद्रपूर जिल्ह्यातून प्रविण ठोंबरे तलाठी ( ग्राम महसूल अधिकारी ) वडाळा पैकु यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांना दिनांक. १ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे हस्ते गौरवण्यात येणार असून अतिशय उत्कृष्ट व प्रामाणिक पणे चिमूर तालुक्यात काम करणारे तलाठी प्रविण ठोंबरे यांचे ग्राम महसूल अधिकारी संघटने तर्फे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!