सावली बाजार समितीवर काँग्रेसचे सभापती, उपसभापती विराजमान @ वडेट्टीवारांचे मार्गदर्शनात सभापतीपदी राजू ठाकरे तर उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांची एकमताने निवड

 सावली बाजार समितीवर काँग्रेसचे सभापती, उपसभापती विराजमान 

@ वडेट्टीवारांचे मार्गदर्शनात सभापतीपदी राजू ठाकरे तर उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांची एकमताने निवड

सावली -  कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदशनात लढल्या गेली. १७ पैकी १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी होत एकहाती सत्ता काबीज केली. शुक्रवारी बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीची सभा पार पडली त्यात सभापतीपदी राजू ठाकरे तर उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली.

       महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, काँग्रेस विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभापतीपदी राजू ठाकरे तसेच उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सेवा सहकारी संस्था क्षेत्रातील सर्वसाधारण गटातून शेतकरी परिवर्तन आघाडीचे अनिल स्वामी, नितीन गोहने, नामदेव ननावरे, राकेश गडमवार, हिवराज शेरकी, राजू ठाकरे, नरेश सुरमवार, इतर मागास प्रवर्ग गटातील निखिल नरेश सुरमवार, विमुक्त जाती भटक्या जमाती विभागातील प्रमोद दाजगाये, महिला आरक्षण गटातून कांताबाई बोरकुटे, नंदाताई आभारे निवडून आले. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून केशव भरडकर, सुनिल बोमनवार, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती गटातून अरविंद भैसारे विजयी झाले. व्यापारी गटातून प्रशांत चिटनूरवार तर मापारी हमाल गटातून मारोती सहारे ह्या संचालकांचा समावेश होता करिता नवनियुक्त संचालकातुन सभापती व उपसभापती यांची निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे पार पडली त्यात एकमताने सभापतीपदी राजू ठाकरे तर उपसभापतीपदी प्रमोद दाजगाये यांची निवड करण्यात आली.

      यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदिप गडमवार, माजी बांधकाम सभापती दिनेश चिटनूरवार तसेच काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्ष सौ.उषा भोयर,शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, नगराध्यक्ष सौ.लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,महिला शहर अध्यक्ष भारती चौधरी, युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे, युवा शहर अध्यक्ष अमर कोणपतीवार आदींनी नवनियुक्त सभापतीपदी राजू ठाकरे व उपसभापतीपदी प्रमोद दाजगायेयांचे अभिनंदन केले. निवडणूक अधिकारी एल.आर.वानखेडे यांनी काम पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!