आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले चिंतावार कुटुंबीयांचे सांत्वन
मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी संजय चिंतावार यांच्या मातोश्री सुधाताई चिंतावार यांची दुःखद निधनानंतर त्यांचे परिवारात कोसळलेल्या दुःखात सहभागी होत या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संजय चिंतावर यांचे घरी भेट देऊन कुटुंबीयांच सांत्वन केले.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिल्यानंतर आणि त्यांनी खालील शब्दात आपले मनोगत व्यक्त केले
आईच्या निधनानंतर आमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आमच्या घरी स्वतः येऊन धीर देणारे, अत्यंत साधेपणाने व आपुलकीने भेटणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार. त्यांचा साधेपणा, माणुसकीची जाणीव आणि संवेदनशील स्वभाव मनाला स्पर्शून गेला. खऱ्या अर्थाने एक लोकनेता कसा असावा, याचे प्रत्यक्ष दर्शन घडले. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याप्रती मनःपूर्वक आदर आणि कृतज्ञता!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!