अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती तसकारांवर आशीर्वाद तरी कुणाचा?
वरोरा तालुक्यातील महसूल अधिकारी रेती तसकारांच्या खिशात का?
पत्रकारांनी फोन द्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला असता करतात फोन कट
रेती तस्कर देत आहे खुलेआम पत्रकारांना धमकी
वरोरा : - वरोरा तालुक्यात सध्या जोमामध्ये रेती तस्करी सुरु आहे. या मध्ये एकीकडे भद्रावती महसूल विभाग कारवाई करत असताना वरोरा महसूल विभाग मात्र संशयच्या भोवऱ्यात सापळत आहे. सध्या तालुक्यातील शेगाव, अर्जुनी, आष्टा, पारोधी, किन्हाळा, कोकेवाडा, धानोली घाटावरून अवैध रेती भरून येत असून कारवाई मात्र होत नाही. त्यामुळे रेती तसकारांची हिम्मत गगनाला भिडलेली आहे. रेती तस्कर हे दिवसरात्र रेती उपसा करीत असून महसूल विभागाच्या संगणमताने हा सगळा कारभार सुरु असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. यातच आता लोकशाहीचा चौथा स्तंभ देखील सुरक्षित राहिला नसल्याचे दिसत आहे. रेती घाटावर जर माहिती घेण्यासाठी बातमी संकलणासाठी पत्रकार गेले असता हे रेती तस्कर गुंडे असल्यासारखे प्रत्रकारांच्या गाड्यांच्या चाब्या काढण्यापासून तर मारायला अंगावर चालून येण्यापर्यंत यांची मजल वाढलेली आहे. व तुमच्यानी जे होते ते करा आमचं कोणीही वाकड करू शकत नाही अशा धमक्या रेती तस्कर खुलेआम देत आहे. त्यामुळे आता महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांच्या कार्यावर व सोबतच असलेल्या संगलमतावर आता प्रशचिन्ह निर्माण होत आहे. जर हे तहसील चे काही महसूल अधिकारीच जर रेती तस्करांसोबत हात मिळवणी करून असेल तर यांना आळा घालणार तरी कोन? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. व या कडे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आता लक्ष पुरवून वरोरा तहसील तसेच शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत होणारे अवैध धंद्यावर चाप लावतील का? याकडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!