ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल स्वामी तर उपाध्यक्षपदी खोजेंद्र येलमुले यांची निवड
सावली - सावली तालुका महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघांच्या कार्यकारीणी कालावधी पूर्ण झाल्याने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यासाठी सावली येथील आसोला मेंढा विभागाच्या विश्राम गृहात संघाचे अध्यक्ष अनिल गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात पत्रकार संघाची नविन कार्यकारीणी तयार करण्यात आली असून अध्यक्षपदी अनिल उर्फ मुन्ना स्वामी यांची तर उपाध्यक्षपदी खोजेंद्र येलमुले यांची निवड करण्यात आली.
कार्यकारणीत सचिवपदी आशिष दुधे, प्रसिद्धीप्रमुख पदी देवाजी बावणे,कार्याध्यक्ष पदी प्रफुल तुम्मे तर सदयसपदी सतिश बोम्मावार, प्रविण गेडाम,अनिल गुरुनुले,दिलीप फुलबांधे, आशिष पुण्यपवार विजय कोरेवार, लखन मेश्राम, रविंद्र कुडकावार यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून सावली तालुक्यात अनेक वर्षापासून तालुक्यातील समस्यांवर आक्रमक पध्दतीने प्रशासनावर अंकुश निर्माण करुन समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड काळात संघाने उत्कृष्ट काम केले. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर असे अनेक उपक्रम राबविण्यात आले होते तसेच उपक्रम राबविणे आणि विविध समस्या सोडवण्या करिता कटिबद्ध आहे. जनहितार्थ विविध उपक्रम राबवून संघाला बळकट करून अधिक जोमाने काम करण्यासाठी नव्याने तालुका कार्यकारीणी गठीत करण्यात आल्याचे प्रतिपादन नवनियुक्त अध्यक्ष अनिल उर्फ मुन्नाभाऊ स्वामी यांनी स्पष्ट केले.
बाजार समिती संचालक पदी निवड झाल्याने सत्कार
सावली तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडुण आल्याने नवनियुक्त अध्यक्ष अनिल भाऊ स्वामी यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. बैठकी मध्ये आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकारी सदस्यांकडुन नविन कार्यकारीणीचे अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!