अवैधरित्या रेतीची तस्करी करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर वनविभागाची धडक कारवाई
चिमूर तालुक्यातील पळसगाव येथील घटना
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यात येत असलेल्या पळसगाव येथील बफर झोन वनपरिक्षेत्रातील महसूल आणि वनविभागाच्या हद्दीतून अवैधरित्या रेतीची तस्करी करीत असताना सकाळी अंदाजे ९ वाजता ३ ट्रॅक्टरवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धडक कारवाई करीत तीनही ट्रॅक्टर पळसगाव येथील वन कार्यालयात आणून जप्त करण्यात आले.व जप्त केलेले दोन ट्रॅक्टर हे बिना नंबरचे आहेत तर एका ट्रॅक्टरचे क्रमांक. MH 34 L 8739 या नंबर चा आहे.वन कर्मचारी यांनी जप्त केलेल्या ट्रॅक्टरचा पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी चिमूर तहसीलचे महसूल अधिकारी तहसीलदार श्रिधर राजमाने यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पुढील कारवाई तहसीलदार श्रिधर राजमाने कशाप्रकारे करतात याकडे चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागलेल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!