पवनी येथील वैजेश्वर स्मशान भूमी येथील समस्याच्या बाबतीत मुख्याधिकारी पवनी यांना दिले निवेदन

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

पवनी : - श्री वैजेश्वर मोक्षधाम येथील बांधलेल्या टिनाचे शेडचे खाली असलेल्या पायऱ्यावर नेहमी वरील शेतकऱ्यांचे शेतातून सांडपाणी झिरपत असते. त्यामुळे मयतीसाठी आलेल्या लोकांना बसता सुद्धा येत नाही. पाणी वाहत असल्यामुळे तिथे शेवाळ झाले त्यामुळे घसरून पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषयाचे अनुषंगाने पायऱ्याच्या पाठीमागे संरक्षण वॉल बांधावी असे केल्यास होणारी अडचण व धोका होणार नाही. या आवश्यक बाबीवर त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी ह्या मागणीसाठी दिनांक.२३ एप्रिल २०२५ ला पवनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर विवेक मेश्राम यांना वैजेश्वर देवस्थान पंचकमिटी पवनी च्या वतीने अध्यक्ष भास्कर उरकुडकर, सचिव महादेव लिचडे, सहसचिव सुरेश अवसरे, कोषाध्यक्ष प्रकाश पोटफोडे तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते बंडूभाऊ हटवार आणि पवनीचे कालका माता मंदिर चे ट्रस्टी तात्याभाऊ माळवी या प्रमुख मंडळी च्या हस्ते निवेदन देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!