वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात मेंढपाळाचा मृत्यू
आज पहाटेच्या दरम्यान मूल शहरालगत सोमनाथ रोडवरील शेत शिवारात वाघाने हल्ला केल्याने मेंढपाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. मल्लाजी येगावार (६८) असे मृतक मेंढपाळाचे नाव असून तो मूल येथील कुरमार मोहल्यात राहतो.
गणेश कावळे यांचे शेताजवळ ही घटना घडल्याचे प्रथम दर्शनी माहिती आहे.
घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे.
घटनास्थळाजवळ मेंढपाळाचे धड वेगळे डोके आणि मृतकाचे धोतर आढळून आले.
दोन दिवसांपूर्वीच मूळ तालुक्यातील एमआयडीसी परिसरात वाघ आणि मेंढपाळाचा बळी घेतला होता हे वृत्त ताजे असतानाच दोन दिवसात वाघांनी दुसऱ्या मेंढपाळाचा बळी घेतल्याने परिसरात संताप व्यक्त केल जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!