आशा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा
आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न
शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )
चिमूर : - दिनांक. २७/०३/२०२५ ला पंचायत समिती चिमूर येथील सभागृह येथे आशा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.आशा स्वयंसेवीमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी आशा दिवस साजरा करण्यात येतो. हिंदू नववर्ष व गुढी पाडव्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकल नृत्य, समुह नृत्य, गायन व इतर विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विजेत्या स्पर्धकांना ट्राफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया उपस्थित होते तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहनिश गिरी, गटविकास अधिकारी नितीन फुलझेले, राजू देवतळे, प्रकाश वाकडे, पोईनकर सर, डुकरे, मायाबाई नन्नावरे, कमल असावा, घनश्याम डुकरे, वैधकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय चिमूर, तालुका समुह संघटक दुर्गा रोहनकर तालुका कार्यक्रम सहाय्यक किशोर गेडेकर व ईतर कर्मचारी सर्व उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!